ते राहत असलेल्या सदनिकेतून वास येत होता. या बाबतची माहिती रहिवाशांनी पोलिसांना दिली. तळेगाव पोलिसांनी धाव घेतली. सदनिकेचा दरवाजा तोडण्यात आला. महाजनी यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाला होता. महाजनी यांचा मुलगा अभिनेता गश्मिर मुंबईत राहायला आहे.
गश्मिरला पोलिसांनी ही माहिती दिली असून, ते तळेगाव दाभाडे येथे रवाना झाले आहेत. शविच्छेदनानंतर महाजनी यांचा मृतदेह ताब्यात देण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. महाजनी यांचा मृत्यू दोन ते तीन दिवसांपूर्वी झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.