पिंपरी (Pclive7.com):- रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या अध्यक्षपदी सुधीर मरळ तर सचिवपदी रामेश्वर पवार ह्यांची निवड करण्यात आली. क्लबच्या सर्व संचालक मंडळाचा पद्ग्रहन सोहळा रावेत येथे संपन्न झाला.
प्रांतपाल मंजू फडके यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या ह्या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून डिस्टिक गव्हर्नर इलेक्ट शितल शहा, माजी नगरसेवक मोरेश्वरभाऊ भोंडवे, असिस्टंट गव्हर्नर रो.मेहुल परमार हे उपस्थित होते. यावेळी क्लबच्या वर्षभरतील विविध सामाजिक प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले.
मागील ६ वर्षांपासून पिंपरी चिंचवड शहराची जीवनदायिनी पवनानदी संवर्धनासाठी रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी सातत्याने विविध सामाजिक प्रकल्प राबवत जनजागृती करत आहे. हे काम अतिशय उल्लेखनीय आहे असे गौरव उद्गार माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे ह्यांनी काढत क्लबच्या सदस्याचे कौतुक केले.
यावेळी माजी अध्यक्ष गणेश बोरा, संस्थापक अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर, नियोजित अध्यक्ष रुपेश मुनोत, युथ डायरेक्टर रो.शेखरअण्णा चिंचवडे, पब्लिक रिलेशन डारेक्टर वसंत ढवळे व राजेंद्र चिंचवडे, हॅपी व्हिलेज डायरेक्टर प्रदीप वाल्हेकर व पाटीलबुवा चिंचवडे, इव्हेंट डायरेक्टर सुभाष वाल्हेकर व राहुल मुनोत, मेम्बरशीप डायरेक्टर सचिन खोले, लिटरसी डायरेक्टर प्रणाली हरपुडे, प्रोजेक्ट डायरेक्टर रेश्मा बोरा, आरोग्य आणि स्वछता डायरेक्टर संदीप वाल्हेकर व निलेश मरळ, सर्जेन्ट ऑफ आर्म सदाशिव जाधव, महिला व बाल आरोग्य डायरेक्टर डॉ मोहन पवार, महिला सबलीकरण डायरेक्टर संदीप भालके व स्वाती सुनील वाल्हेकर, पर्यावरण संरक्षण डायरेक्टर भारत चव्हाण, पब्लिक इमेज डायरेक्टर निलेश सोनवणे, ट्रेजरार रसिका वाल्हेकर, सीएसआर डायरेक्टर सोमनाथ हरपुडे, फोऊंडेशन डायरेक्टर अमर शेळके ह्यांनी ही पदभार स्वीकारला.
श्री. मनोज दगडे, गोविंद जगदाळे सर, अनुजा मरळ, तन्मय वाल्हेकर ह्यांनी नवीन रोटरी सदयसत्वाची शपथ ग्रहण केली. यावेळी माजी नगरसेविका करुणाताई चिंचवडे, ज्योतीताई भालके, रो. अनिल नेवाळे, रवींद्र भावे, अशोक शिंदे, गोपाळराव दगडे, शिरीष कुंभार ह्यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.