पिंपरी (Pclive7.com):- संततधार सुरू असलेल्या पावसामुळे कासारसाई धरण ८८ टक्के भरले आहे. धरणातील पाण्याच्या साठ्यात वाढत असल्याने काल (दि.२७) धरणाच्या सांडव्यावरून कासारसाई नाला पात्रामध्ये ४०० क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
धरणाच्या सांडव्यावरून कासारसाई नाला पात्रामध्ये विसर्ग सुरू करण्यात आला असून नागरिकांनी, नदी पात्रात उतरू नये आणि पात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत असे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.