पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीगावामध्ये माजी नगरसेवक संदीप वाघरे यांच्या वतीने आयोजित श्री काळभैरवनाथ कथा व किर्तन सोहळ्याचा सांगता समारंभ श्री काळभैरव नाथ मंदिर पिंपरीगाव येथे संपन्न झाला.
कै. सौ.सुमनताई बाळकृष्ण वाघेरे यांच्या स्मरणार्थ श्री काळभैरवनाथ कथेचे आयोजन दिनांक ५ व ६ ऑगस्ट या दिवशी करण्यात आले होते. कथेचे निरुपन सौ. संगिताई येणपुरे -चोपडे यांच्या वतीने करण्यात आले. तसेच कै. सौ. सविताताई सुभाष वाघरे यांच्या स्मरणार्थ कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्या मध्ये ह.भ.प. संतोष महाराज काळोखे (देहू), ह.भ.प.एकनाथ महाराज वाडीकर (पाली), ह.भ.प.विकास महाराज झिरपे (नगर), ह.भ.प.महादेव महाराज भुजबळ (वाकड) यांचा किर्तनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये पार पडला. पंचक्रोशीतून आलेल्या भाविकासाठी वाघेरे यांच्या वतीने सुमारे एक हजार नागरिकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना वाघेरे म्हणाले की, पिंपरीगावातील श्री काळभैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केल्यानंतर मंदिराची महती केवळ राज्यातच नव्हे तर देशभरात व्हावी यासाठी झी टॉकीज व संदिप वाघेरे युवामंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण झी टॉकीज या वाहीनीवर दिनांक 12 ऑगस्ट पासून प्रक्षेपीत केले जाणार आहे. सदर कार्यक्रमाचे नियोजन राजेंद्र वाघेरे, भाऊसाहेब राक्षे, गणेशभाऊ मंजाळ, रंजनाताई जाधव, श्रीकांत वाघरे, सचिन वाघरे, विजय जाचक यांच्या वतीने करण्यात आले होते.
कार्यक्रमास वायसीएम रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विनायक पाटील, वस्ताद दत्तोबा नाणेकर, जयवंत शिंदे, हनुमंत वाघेरे, अंकुश वाघेरे, रामभाऊ कुदळे आदी मान्यवर उपस्थित होते.