पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड शहर जिल्ह्यातील युवकांसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे सदस्य नोंदणी अभियान सुरू करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष विशाल वाकडकर म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहराचा विकास हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातूनच झाला. आता विकासकामे, विविध समस्या, अहवाने, सूचना, उपाययोजना यासाठी तरूणांचा सहभाग महत्वाचा आहे. तरूणांचा सहभाग शहराच्या विकासासाठी एक महत्वचं पाऊल ठरू शकतो. त्याअनुषंगानेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसने सदस्य नोंदणी अभियान सुरू केले आहे.
या अभियानात तरूणांनी नोंदणी करून अभियानामद्ये नोंदणी करून जिल्हा कार्यकारिणी सदस्य होण्याकरिता सामील व्हावे. अजित पवार यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड शहराला समृद्ध शहर बनवूयात, त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून नोंदणी करावी असे आवाहन विशाल वाकडकर यांनी केले आहे.
http://www.vishalwakadkar.org