पिंपरी (Pclive7.com):- आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी वाकड येथे युवानेते राम वाकडकर यांच्या वतीने विविध ठिकाणी मूर्ती विसर्जन हौद व मुर्ती संकलन केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे.
याविषयी माहिती देताना राम वाकडकर म्हणाले की, नदीपात्रामध्ये मूर्ती विसर्जन करण्यास मनाई आहे. त्यामुळे नागरिकांच्या भावनेचा विचार करत वाकड परिसरातील सर्व नागरिकांसाठी सहा ठिकाणी गणेश विसर्जन हौदची व्यवस्था करण्यात आली आहे.
नागरिकांच्या सोयीसाठी राम वाकडकर यांच्या वतीने गणेश विसर्जनाची व्यवस्था खालील ठिकाणी करण्यात आलेली आहे.
१) अक्षरा इंटरनॅशनल स्कूल समोर शनी मंदिर रोड, २) प्रिस्टीन प्रोफाइल सोसायटी क्र.१ च्या समोर, ३) आरमाडा सोसायटी, पारखे वस्ती समोर, ४) चौधरी पार्क, प्रेमजी मिठाई समोर, ५) अटलन्टा-२, ६) अटलन्टा-३ या ठिकाणी गणेश विसर्जन हौद ची व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी गणरायाची आरती करण्यासाठी मंडप उभारण्यात आला आहे. तसेच मुर्ती विसर्जनासाठी शुद्ध पाण्याचे हौद तयार करण्यात आलेले आहे.