4 वाजून 35 मिनिटांनी मानाचा पहिला कसबा गणपतीचं विसर्जन..
पुण्यातील ग्रामदैवत आणि मानाच्या पहिला कसबा गणपतीचं विसर्जन थाटामाटात कऱण्यात आलं. नदी पात्रातील हौदात पारंपरित पद्धतीने 4 वाजून 35 मिनिटांनी विसर्जन करण्यात आलं.
मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपतीचं 5 वाजून 11 मिनिटांनी विसर्जन..
मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपतीचं 5 वाजून 11 मिनिटांनी विसर्जन झालं. पालखीत दाखल होत मोठ्या जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली होती. अखेर अनेकांनी तांबडी जोगेश्वरी बाप्पाला साश्रु नयनांनी निरोप दिला.
पुण्याचा मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपतीचं 5 वाजून 55 मिनिटांनी विसर्जन..
पुण्याचा मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपतीचं विसर्जन 5 वाजून 55 मिनिटांनी करण्यात आलं. पाचांळेश्वर घाटावर या गणपतीला निरोप देण्यात आला.
मानाचा चौथा तुळशीबाग गणपतीचं 6 वाजून 32 मिनिटांनी विसर्जन..
मानाचा चौथा तुळशीबाग गणपतीचे 6 वाजून 32 मिनिटांनी विसर्जन झाले. डेक्कन परिसरातील महापालिकेच्या हौदात विसर्जन करण्यात आलं.