पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीपुरवठा गुरुवारी (दि.५) बंद राहणार आहे. तर शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. अशी माहिती पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागकडून देण्यात आली आहे. निगडीतील जलशुद्धीकरण केंद्रात देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्यामुळे शहरातील पाणीपुरवठी बंद ठेवण्यात आला आहे.
निगडीतील सेक्टर क्र.२३ येथील जलशुध्दीकरण केंद्रातील पाणीपुरवठा विषयक नियमित देखभाल दुरुस्तीची आवश्यक कामे केली जाणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर शहरातील पाणीपुरवठा बंद ठेण्यात येणार असल्याची माहिती सह शहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी दिली.
मावळातील पवना धरणातून पिंपरी-चिंचवकरांना पाणीपुरवठा केला जातो. रावेत येथील बंधा-यातून अशुद्ध जलउपसा करण्यात येतो. सेक्टर २३ निगडी येथे पाणी शुद्ध करुन शहरवासीयांना पुरवठा केला जातो. जलशुद्धीकरण केंद्रातील पाणीपुरवठा विषयक नियमित देखभाल दुरुस्ती, पाणी वितरण व्यवस्थेतील विविध ठिकाणी देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी गुरुवारी शहरातील पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे.
गुरुवारी सकाळचा पाणीपुरवठा करण्यात येणार मात्र त्यानंतर दुरुस्तीच्या कामामुळे शहरातील सर्व भागांचा सायंकाळाचा पाणीपुरवठा होणार नाही. दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठ्याची सर्व यंत्रणा बंद ठेवल्यामुळे शहरातील सर्व भागात दुस-या दिवशी म्हणजेच शुक्रवारी सकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.