पिंपरी (Pclive7.com):- महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून दापोडी येथील गणेश इंग्लिश मेडीयम स्कूल व जुनिअर कॉलेजने स्वच्छता अभियानाद्वारे भव्य रॅलीचे आयोजन केले होते.
यावेळी शाळेचे संस्थाप्रमुख एस. बी. पाटील, शाळेचे विश्वस्त गणेश पाटील, आकाश पाटील व मंगेश पाटील तसेच शाळेचे सहयोगी संचालक सुनील शेवाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची प्रभातफेरी दापोडी पिंपळेगुरव व सांगवी या परिसरात काढण्यात आली होती. त्यामध्ये स्वच्छता अभियानातंर्गत सार्वजनिक परिसर, प्रार्थनास्थळे, बाजार, बसस्थानके आदी ठिकाणी थांबून विद्यार्थ्यांनी घोषवाक्ये व पथनाट्याच्या माध्यमातून पृथ्वी, जल, वायू स्वछ ठेवण्यासाठी सर्वानी प्रयत्नशील राहिले पाहिजे हा संदेश दिला.
सदर प्रभातफेरीमध्ये विद्यार्थ्यांनी रस्ते वाहतुकीचे नियम तसेच वाहतुकीच्या वेळी हेल्मेट सक्तीचे महत्व पटवून दिले. या प्रभातफेरी विद्यार्थ्यांसह शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचारीही उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.