पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील उपनिरीक्षकाला ड्रीम ११ चे दीड कोटींचं बक्षीस लागले आहे. यामुळे त्यांचे नशीब पालटल आहे. सोमनाथ झेंडे असे त्यांचे नाव असून ते पिंपरी- चिंचवड पोलीस मुख्यालयात कार्यरत असतात. बांगलादेश विरुद्ध इंग्लंड या क्रिकेट सामन्यावर ड्रीम इलेव्हन टीम लावली होती अशी माहिती त्यांनी दिली आहे.
सध्या एक दिवसीय विश्वचषक सुरू आहे. पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे हे करोडपती झाले आहेत. झेंडे हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील मुख्यालयात कार्यरत आहेत. गेल्या दोन ते तीन महिन्यापासून त्यांनी ड्रीम इलेव्हन खेळण्यास सुरू केले होते. त्यांनी कालच बांगलादेश विरुद्ध इंग्लंड या क्रिकेट सामन्यावरती ड्रीम इलेव्हन ची टीम तयार केली ती अव्वल आली असून त्यामुळे सोमनाथ झेंडे हे करोडपती झाले आहेत. त्यांच्या खात्यावर दोन दोन लाख रुपये येण्यास सुरुवात झाले असल्याची माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.
या घटनेनंतर झेंडे यांच्या कुटुंबात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. एकीकडे ड्रीम इलेव्हन सारख्या गेमवर बंदी आणावी अशी मागणी नेहमी होते. परंतु, अशा काही गोष्टी समोर आल्यानंतर सर्वसामान्य व्यक्तीला देखील करोडपती होता येऊ शकतो हे बघायला मिळत आहे.