पिंपरी (Pclive7.com):- तानाजी लांडगे क्रीडा संकुल कासारवाडी येथे झालेल्या शालेय जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय लांडेवाडी भोसरी येथील 19 वर्षाखालील मुलींच्या संघाने अंतिम सामन्यात ताराबाई मुथा हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चिंचवड या संघाचा 27-14अशा 13 गुणांच्या फरकाने पराभव करत सलग आठव्यांदा विजेतेपद संपादन केलेले आहे.
या स्पर्धेत संघातील कु. आदिती दौंडकर, कु.अफरीन खान, कु.हितांशी खेडेकर यांनी आक्रमक चढाया करत तसेच डावा कोपरा कु. चांदणी गौतम, उजवा कोपरा रक्षक कु. आदिती कडुसकर, डावा पाचवा मध्य रक्षक कु.मुक्ता वाकुडे,व निशा जाधव यांनी उत्कृष्ट पकडी घेत संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. तसेच उपांत्य फेरीतील रामचंद्र गायकवाड ज्युनिअर कॉलेज दिघी या संघाचा एकतर्फी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
सदर संघात पुजा जाधव, निता जाधव, निशा जाधव, दुर्गा केंद्रे, पुनम जाधव, नागिन बेलपाडे, अफ्रिन खान, आदिती दौंडकर, चांदणी गौतम, हिमांशी खेडेकर, आदित्य कडुसकर, मुक्ता वाकुडे या सर्व खेळाडूंचा समावेश होता. या सर्व खेळाडूंची अहमदनगर येथे होणाऱ्या शालेय विभागस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेली आहे. या सर्व खेळाडूंना कनिष्ठ महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. गोपीचंद करंडे यांनी विशेष मार्गदर्शन केले.
या खेळाडूंच्या यशाबद्दल संस्थेचे संस्थेचे अध्यक्ष व भोसरीचे प्रथम आमदार विलासराव लांडे यांनी विशेष अभिनंदन करून खेळाडूंना विभागस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेचे खजिनदार व पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, सचिव सुधीर मुंगसे, विश्वस्त व नगरसेवक विक्रांत लांडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कानडे के.जी, उपप्राचार्य प्रा.किरण चौधरी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ.नेहा बोरसे, रजिस्ट्रार सौ.अश्विनी चव्हाण, विभाग प्रमुख प्रा. राजू हजारे, प्रा.योगिता बारवकर, प्रा. संगिता गवस व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले.