धरमशाला (Pclive7.com):- यंदाचा विश्वचषकात दुबळे समजले जाणारे संघ कमाल करताना दिसतं आहे. दुबळ्या नेदरलँड्सने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचा सुपडा साफ केला आहे. हा वर्ल्डकपमधील दुसऱ्या उलटफेर आहे. गतविजेता इग्लंडला अफगाणिस्तानने हरवलं त्यानंतर नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये सलग 2 सामने जिंकणाऱ्या दक्षिण आफ्रिकेची नेदरलँड्सच्या खेळासमोर फज्जा उडाला.
246 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघाला घाम फुटला. नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेला 207 धावांवर गुंडाळलं. नेदरलँड्स गोलंदाजांसमोर दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना मैदानाबाहेरचा रस्ता गाठावा लागला. दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू क्विंटन डी कॉक शतकी हॅटट्रिक करण्यासाठी मैदानात उतरला होता. मात्र नेदरलँड्सच्या कॉलिन अकरमन याने त्याचं स्वप्न धुळीस मिळवलं. नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेला 42.5 ओव्हर्समध्ये 207 धावांवर ऑलआऊट करुन वर्ल्डकपमधील दुसऱ्या मोठा उलटफेर केला आहे. डेव्हिड मिलर वगळता संघाचा एकही फलंदाज क्रीजवर थांबून नेदरलँडच्या गोलंदाजांचा सामना करण्यात अपयशी ठरला.
विश्वचषक 2023 मधील हा 15 वा सामना धरमशालामधील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झाला. पावसामुळे नाणेफेकीला विलंब झाला मात्र तीन वाजता हा सामना सुरु झाला. शिवाय पावसामुळे 43 ओव्हरचा हा सामना खेळवण्यात आला. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेल जिंकून नेदरलँड्सविरोधात गोलंदाजी निर्णय घेतला.
दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन..
टेम्बा बावुमा (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रॅसी व्हॅन डर ड्युसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, कागिसो रबाडा, केशव महाराज, लुंगी एनगिडी आणि गेराल्ड कोएत्झी.
नेदरलँड्स प्लेईंग ईलेव्हन..
स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार आणि विकेटकीपर), विक्रमजीत सिंग, मॅक्स ओडॉड, कॉलिन अकरमन, बास डी लीडे, तेजा निदामानुरु, सायब्रँड एंजेलब्रेक्ट, लोगन व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त आणि पॉल व्हॅन मीकरेन.