पिंपरी (Pclive7.com):- भाजपच्या प्रदेश प्रवक्ते पदाचा राजीनामा दिलेले पिंपरी-चिंचवड महापालिकेतील माजी सभागृह नेते एकनाथ पवार हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला आहे. आज (दि.२५) मुंबई येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आहे.
यावेळी खासदार संजय राऊत, संपर्क प्रमुख सचिन आहिर, शिवसेना नेत्या सुलभा उबाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

मी मराठा योद्धा श्री मनोजजी जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठींबा देत भारतीय जनता पार्टीचा सर्व पदाचा राजीनामा दिला असून मराठा आरक्षणास पाठिंबा देत असलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) या गटात माझ्या जन्मदिनी आज बुधवारी पक्षप्रवेश करणार असल्याचे पवार यांनी फेसबुकवर सांगितले होते. त्यानुसार पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत एकनाथ पवार यांनी शिवबंधन बांधले आहे.

पवार यांच्या शिवसेनेतील प्रवेशाने भाजपला खिंडार पडले आहे. पवार हे अतिशय जुने आणि निष्ठावान कार्यकर्ते होते. त्यांनी भाजपचा त्याग करत शिवबंधन हाती बांधले आहे.























Join Our Whatsapp Group