पिंपरी (Pclive7.com):- मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पिंपरी चिंचवड मध्ये मराठा क्रांती मोर्चा चे आंदोलन आक्रमक झाले आहेत. राज्याचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आज पिंपरी चिंचवड दौऱ्यावर होते. यावेळी त्यांना काळ झेंडे दाखवत निषेध करण्यात आला. एक मराठा लाख मराठा, मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे अशी जोरदार घोषणाबाजी यावेळी आंदोलकांनी केली.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे आज पिंपरी चिंचवड दौऱ्यावर होते. महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयाला भेट देऊन ते पाहणी करणार होते. मात्र ते शहरात येण्याआधीच मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. दानवे वाय सी एम रुग्णालयात दाखल होतास आंदोलकांनी काळे झेंडे दाखवत जोरदार घोषणाबाजी केली. काही क्षणातच या आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.
राजकीय नेत्यांना मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी पिंपरी चिंचवड शहरात येण्यास बंदी घातली आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे आज पिंपरी चिंचवड दौऱ्यावर होते.