पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर येथील राजमाता जिजाऊ उद्यान याठिकाणी “विकसित भारत संकल्प यात्रा” या कार्यक्रमाचे उदघाटन नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या हस्ते करण्यात आले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सर्व शासकीय योजना नागरिकांना मोफत उपलब्ध करून देण्याच्या हेतूने आणि माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या पुढाकाराने “विकसित भारत संकल्प यात्रा” हा उपक्रम प्रभाग क्र.२८ मध्ये राबविण्यात आला आहे.
“विकसित भारत संकल्प यात्रा” अंतर्गत पक्के घर, नळाच्या पाण्याची जोडणी, शौचालय, मोफत उपचार, मोफत अन्नधान्य, गॅस जोडणी, वीज जोडणी, बँक खाते उघडणे, पीएम किसान सन्मान निधी, पीएम फसल विमा योजना, पीएम स्वनिधी योजना, आभा कार्ड, आयुष्यमान भारत विमा योजना आरोग्य कार्ड, आधार कार्ड दुरुस्ती, मोफत आरोग्य तपासणी शिबीर, समाज विकास विभाग मार्फत विविध कल्याणकारी योजना, बचत गट नोंदणी अर्ज आणि बचत गट नोंदणी प्रमाणपत्र वाटप आणि पीएम स्वामित्व मालमत्ता कार्ड यासह विविध योजना परिसरातील नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे.
हे अभियान राबविण्याचे मुख्य उद्देश म्हणजे सर्वसामान्य कुटुंबांना कुठल्याही शासकीय कार्यालयात वारंवार हेलपाटे न मारता माहिती मिळणे. तसेच शासकीय योजनांची माहिती प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचवण्यासाठी केलेला प्रयत्न म्हणजे “विकसित भारत संकल्प यात्रा”. प्रभागातील नागरिकांनी या संधीचा लाभ घेत मोफत उपलब्ध करून देण्यात आलेल्या या सर्व शासकीय योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन “नगरसेवक शत्रुघ्न काटे” यांनी केले आहे.