पिंपरी चिंचवड क्रिकेट असोसिएशन व लायन्स क्लब ऑफ रहाटणी आयोजित १४ वर्षांखालील शालेय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशन व लायन्स क्लब ऑफ रहाटणी यांचे संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवडमधील १४ वर्षांखालील शालेय मुलांच्या क्रिकेट स्पर्धेचे “अचीवर क्रिकेट मैदान”, रावेत येथे आयोजन करण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील, शालेय स्तरावर “क्रिकेट” या खेळाचा विकास व्हावा व नवोदित खेळाडूंना उत्तम स्पर्धात्मक क्रिकेट खेळण्याची संधी मिळावी व त्यातून त्यांचे भविष्य घडावे यासाठी प्रथमच “पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनच्या” माध्यमातून आंतरशालेय स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे “पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनचे” सचिव राजू कोतवाल यांनी सांगितले. या स्पर्धेत एकूण सोळा संघानी भाग घेतला असून ही स्पर्धा बाद पद्धतीने होत आहे.
स्पर्धेच्या सुरुवातीला संस्थेचे सहसचिव दिलीपसिंह मोहिते यांनी “स्पर्धेचे महत्त्व व स्पर्धेविषयीची माहिती ” दिली. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना लायन अमोल दापोरकर म्हणाले की, या स्पर्धेचा फायदा १४ वर्षाखालील मुलांना स्पर्धा खेळण्यासाठी त्यांची मनोवृत्ती, मनोबल तयार होईल असे मला वाटते. त्याचा फायदा मुलांना पुढे मोठ्या स्पर्धा खेळताना होईल याच प्रसंगी एसएनबीपीचे स्पोर्ट्स डायरेक्टर फिरोज शेख, लायन अमोल दापोरकर, लायन भाऊ कोकणे, लायन हर्ष नायर यांचा सत्कार संस्थेच्या सदस्यांकरवी करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप वाघ यांनी तर स्पर्धेचे संपूर्ण आयोजन मुकेश गुजराती व राजू कोतवाल यांनी केले आहे. या कार्यक्रमाचे शेवटी आभार प्रदर्शन नरेंद्र कदम यांनी केले.
या स्पर्धेकरिता प्रथम पारितोषिक- रुपये ११०००/- व चषक, द्वितीय पारितोषक- रुपये ७०००/- व चषक, तृतीय पारितोषिक रुपये ४०००/- व चषक, चतुर्थ पारितोषिक- चषक असे आहे; याशिवाय उत्कृष्ट सामनावीर, स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज व मालिकावीर असे पारितोषिके खेळाडूंसाठी जाहीर करण्यात आली. भविष्यात शालेय स्पर्धा वय गट १७ व १९ वर्षांखालील मुलामुलींसाठी घेण्यात येणार आहेत.