पिंपरी (Pclive7.com):- मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावणाऱ्या टोळीला पिंपरी-चिंचवडच्या गुन्हे शाखा युनिट चारने बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून १४ गुन्हे उघड झाले असून १६ लाख ३० हजारांचे २५ तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. या गुन्ह्यामध्ये आनंद लोहार, अक्षय अशोक मुरकुटे, गणपत जवाहरलाल शर्मा (चोरीचे दागिने घेणारे ज्वेलर्स) आणि दर्शन रमेश पारीख (चोरीचे दागिने घेणारे ज्वेलर्स) यांना अटक करण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील मॉर्निंग वॉकला आलेल्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी तसेच मंगळसूत्र चोरणाऱ्या भामट्यांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने व चोरीसाठी वापरणारे दुचाकी असा एकूण १३ लाख ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आनंद सुनील साळुंखे, अक्षय अशोक मुरकुटे व धीरज गोपाळ गवळी असे आरोपितांची नावे असून यांनी चोरी केलेले दागिने विकणाऱ्या दोन सराफ व्यवसायिकांना देखील अटक करण्यात आली आहे.
पोलीस तपासामध्ये आरोपींनी पिंपरी चिंचवड शहरात बारा चोऱ्या तर पुणे शहरात दोन चोऱ्या केल्याचे कबूल केले आहे. तीनही आरोपी हे अट्टल गुन्हेगार असून त्यांच्या नावे शहरात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे देखील दाखल आहेत.