पिंपरी (Pclive7.com):- सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागताचे औचित्य साधून पिंपळे सौदागर येथील साई पर्ल सोसायटीमध्ये सादर करण्यात आलेला सांस्कृतिक कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. सोसायटीमधील ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने आयोजित या रंगारंग कार्यक्रमात सादर करण्यात आलेल्या मराठी – हिंदी चित्रपटातील सदाबहार गाणी, शेरशायरी आणि मिमिक्रीला उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचा प्रारंभ श्रीकांत माने यांनी “ना हम तुम्हे जाने ना तुम हमे जाने” या गीताने केला. त्यानंतर मधू मेघानी, अरविंद माने, मानसी कुलकर्णी, किरण तिर्थगिरीकर, चंद्रकांत पवार, मीनाक्षी माने, विलास भाले, भारती न्यायाधीश, वंदना जोशी, रसिका काटे, संध्या नांदगावकर, मंजिरी बनसोडे या कलावंतांनी आपली कला सादर केली.
सदाबहार अशा या कार्यक्रमाची सांगता सहभोजन आणि नववर्षाचे स्वागत तसेच लहानू कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सोसायटीमधील सुखदेव फुलेवाले, रामकुमार अग्रवाल, किशोर मेघानी, दिलीप नांदगावकर, बाळासाहेब काटे, वसंत बिरुड, तानाजी कांबळे, मधुकर चौधरी, दासाणी, वारके यांनी परिश्रम घेतले.