पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात नमो चषक-२०२४ क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ४ तारखेपासून या स्पर्धांना सुरुवात झाली आहे. १४ तारखेपर्यंत या स्पर्धा चालणार आहेत. शहरातील विविध भागांमध्ये स्पर्धा होत आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन रविवारी (दि.७) सायंकाळी ५:३० वाजता पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब पुतळ्याशेजारील आंबेडकर मैदानात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती शुक्रवारी (दि.५) पत्रकार परिषदेत देण्यात आली.
भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष तुषार हिंगे, क्रीडा प्रकोष्टचे जयदीप खापरे आणि आमदार उमा खापरे यांच्या सहकायनि या स्पर्धा होत आहेत. पत्रकार परिषदेला उमा खापरे, भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस अनुप मोरे, तुषार हिंगे, जयदीप खापरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
या प्रसंगी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सदाशिव खाडे, माजी नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे, केशव घोळवे, अमित गोरखे, तेजस्विनी कदम यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
या क्रीडा स्पर्धामध्ये जिल्हा आणि राज्यस्तरीय खेळाडू सहभागी होणार आहेत. त्यानिमित्त विविध जिल्ह्यांतील खेळाडू पिंपरी- चिंचवडमध्ये येणार आहेत. महाराष्ट्र राज्य असोसिएशन आणि महाराष्ट्र जिल्हा असोसिएशन यांच्या परवानगीने या स्पर्धा होत आहेत.