पिंपरी (Pclive7.com):- शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं निधन वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झालं आहे. एकनाथ शिंदे यांचे विश्वासू अशी त्यांची ओळख होती. अनिल बाबर हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार होते. न्यूमोनिया झाल्याने अनिल बाबर यांच्यावर उपचार सुरू होते.
सांगलीच्या खानापूर विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार होते. राष्ट्रवादी पुरस्कृत सदाशिव पाटलांचा अनिल बाबर यांनी २०१९ ल पराभव केला होता. अनिल बाबर यांच्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना असा राजकीय प्रवास आहे. अनिल बाबर हे ४ वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. १९९०, १९९९, २०१४, २०१९ ला आमदारकीला ते निवडून आले होते.
शिवसेनेत फूट पडल्यापासून अनिल बाबर यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. महाविकास आघाडीवर आपली नाराजी व्यक्त करत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाला सुरवातीपासून खंबीर साथ दिली होती. गुवाहाटीमध्येही अनिल बाबर एकनाथ शिंदे यांच्या सोबत होते.
दरम्यान, ठाकरे गटाकडून अपात्रतेप्रकरणी दिलेल्या नावाच्या यादीत अनिल बाबर यांच्या नावाचाही समावेश होता. अनिल बाबर हे 2019 मध्ये शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले होते. त्यांनी अपक्ष उभा राहिलेल्या सदाशिव पाटील यांचा पराभव केला होता. आमदार अनिल बाबर चार वेळा आमदार झाले आहेत.