पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहराचा आज गुरूवार (दि.२२) रोजी संध्याकाळचा व उद्या शुक्रवार दि.२३ रोजीचा पाणीपुरवठा कमी दाबाने व विस्कळीत राहणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.
पिंपरी चिंचवड शहराला पवना नदीतून पाणीपुरवठा होतो. पवना धरण येथे तांत्रिक बिघाड झाल्यामुळे धरणातून कमी प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे. परिणामी शहराला पाणीपुरवठा करणारे रावेत बंधारा परिसरात पाण्याची पातळी कमी झाली आहे. त्यामुळे आज गुरूवार (दि.२२) संध्याकाळचा व उद्या शुक्रवार (दि.२३) रोजीचा पाणीपुरवठा कमी दाबाने व विस्कळीत राहणार आहे. तरी नागरिकांनी महापालिकेकडील उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.