पुणे (Pclive7.com):- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डॅशिंग नेते वसंत मोरे यांनी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ केलाय. साहेब मला माफ करा, अशी पोस्ट लिहत त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अखेरची साद घातली. वसंत मोरे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून राजीनामा शेअर केलाय. आपण प्राथमिक सदस्यत्व आणि सर्व पदांचा राजीनामा जेत असल्याचे वसंत मोरेंनी म्हटलंय.
डॅशिंग, तडफदार, जनतेमध्ये वावरणारे नेते म्हणून वसंत मोरेंची ओळख आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे मनसेला मोठा धक्का बसलाय. पक्षाच्या स्थापनेपासून मी आपल्यासोबत आहे. आपण मला वेळोवेळी दिलेल्या जबाबदारी मी पार पाडल्या. पक्ष संघटना वाढीसाठी मी 18 वर्षे सातत्याने काम करत आहे. महाराष्ट्र सरचिटणीस म्हणून कार्य केले. मात्र पुणे शहरातील वरिष्ठ सहकाऱ्यांकडून माझ्याविरोधात गलिच्छ राजकारण सुरु आहे. माझ्या पक्षाप्रती असलेल्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले.