पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने फ्लोरेन्स इटाली येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील जलतरण स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणा-या अपंग जलतरणपटू कॅमिला पटनायक हिचा सन्मान स्थायी समिती सभापती सिमा सावळे यांच्या हस्ते करण्य़ात आला.
स्थायी समिती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास जैव विविधता व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, अपक्ष आघाडी गटनेता कैलास बारणे, नगरसदस्या आशा शेडगे, माधुरी कुलकर्णी, निर्मला कुटे, कोमल मेवाणी, अनुराधा गोफणे, वैशाली काळभोर, नगरसदस्य लक्ष्मण उंडे, कुंदन गायकवाड, हर्षल ढोरे, उत्तम केंदळे, अमित गावडे, मोरेश्वर भोंडवे, राजू मिसाळ यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
वयाच्या ३ वर्षापासून कॅमिला पटनायक हिने पोहण्याचा सराव सुरु केला. तिने टाटा मोटर्स कंपनीचे दहा हजार रुपयाचे पारितोषिक मिळविले आहे. नुकतेच गांधीनगर गुजरात येथे झालेल्या विशेष ऑलिम्पीक जलतरण स्पर्धेमध्ये तीने सुवर्ण पदक मिळेविले आहे. ५० मिटर फ्रिस्टाईल राष्ट्रीय पॅरॉऑलिम्पीक जलतरण स्पर्धेमध्ये तीने सुवर्ण पदक मिळविले आहे. यासह राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध ठिकाणी झालेल्या विविध जलतरण स्पर्धेमध्ये कॅमिला पटनायक या अंपग जलतरणपटूने सुवर्ण, रोप्य, ब्रॉझ पदके मिळविली आहेत. त्याबददल तिचा आज महापालिकेत गौरव करण्यात आला.