पुणे (Pclive7.com):- शिवजयंतीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल भाजपचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांचा सर्व स्तरातून निषेध होत होता. यामुळे अहमदनगर येथे दिवसभर तणावपूर्ण परिस्थिती होती. मोठा जनक्षोभ उसळल्यानंतर अखेर रात्री पावणेनऊच्या सुमारास दरेवाडी परिसरातून पोलिसांनी अटक केली.
छिंदम हा सोलापूर रोडवरील दरोवाडी परिसरात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कारवाई करीत पोलिसांनी छिंदम याला अटक केली. दरम्यान, या अटकेबाबत पोलीस काहीही माहिती द्यायला तयार नाहीत. या वक्तव्यानंतर भाजपने छिंदम याला तातडीने राजीनामा घेत पक्षातून निलंबित केले होते.