चाकण (Pclive7.com):- चाकण व महाळुंगे परिसरात होत असलेली वाहतुक कोंडी समस्या सोडवण्यासाठी स्वतः पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे हे ॲक्शन मोडवर आले आहेत. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते त्या ठिकाणची पाहणी करुन गॅब्रियल कंपनी, चाकण येथे संयुक्त वाहतुक नियोजन आढावा बैठक पोलीस आयुक्त यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.
![](http://pclive7.com/wp-content/uploads/2024/07/IMG-20240624-WA00001-300x300.jpg)
या बैठकीला आमदार दिलीप मोहिते पाटील (खेड विधानसभा सदस्य), नॅशनल हायवे ॲथोरिटी ऑफ इंडीयाचे ०५ अधिकारी, एमआयडीसी इंजिनियर, तहसीलदार खेड, गट विकास अधिकारी खेड, कार्यकारी अधिकारी चाकण नगरपरिषद, परिवहन वाहतुक आयुक्त व परिवहन वाहतुक निरीक्षक, पिंपरी चिंचवड मुख्य अभियंता, पुणे महानगर प्रादेशिक विकास महामंडळाचे ३ अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, रस्ते विकास महामंडळ, प्रकल्प अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, खासदार शिरुर यांचे स्वीय सहायक, नॅशनल हायवे ॲथोरिटी ऑफ इंडीयाचे २ कंत्राटदार, राज्य वाहतुक विभागाकडील २ अधिकारी तसेच पोलीस उप-आयुक्त वाहतुक, पोलीस उप-आयुक्त परि.-३, सपोआ वाहतुक, सहायक पोलीस आयुक्त चाकण विभाग, पोलीस निरीक्षक वाहतुक, चाकण व महाळूंगे तसेच चाकण व महाळुगे पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि औद्योगिक विकास महामंडळ, खाजगी कंपन्यांचे एच.आर.ओ. इत्यादी अधिकारी उपस्थित होते.
सदर बैठकीमध्ये चाकण व महाळुंगे परिसरातील वाहतुक समस्यांचा आढावा घेवून सध्याची वाहतूक गर्दीची समस्या सोडविण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याबाबत तसेच इतर संबंधित विभागासोबत संयुक्त कार्यवाही करून समस्या निवारणाबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत.