चिंचवड (Pclive7.com):- आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ डांगे चौक थेरगाव शिवाजी पुतळ्या समोर महाराष्ट्र सरकारच्या अक्षम्य दुर्लक्ष विरोधात जाहीर निषेध नोंदविण्यात आला.
त्यावेळी पिंपरी चिंचवड शहराच्या आम आदमी पार्टीच्या अध्यक्षा मीनाताई जावळे यांनी तीव्र भाषेत निषेध नोंदविला. तसेच चेतन बेंद्रे पदवीधर आघाडी महाराष्ट्र राज्य व संतोष इंगळे उद्योग आघाडी सचिव महाराष्ट्र राज्य यांनी तीव्र भाषेत निषेध नोंदविण्यात आला.
यावेळी पक्षाचे कार्यकर्ते रविराज काळे, वैजनाथ शिरसाठ ब्रह्मानंद जाधव सुरेश बावनकर अजय सिंग, रोहित सरनोबत, गायकवाड सर, सरोज कदम, भारती जाधव दमयंती नेरकर, सीमा बावनकर, सचिन थोरात, जावळे मामा, व पक्षाचे सर्व कार्यकर्ते या आंदोलनास उपस्थित होते. हे आंदोलन पिंपरी चिंचवड शहराच्या अध्यक्ष मीनाताई जावळे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले.