पिंपरी (Pclive7.com):- यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त आपला आनंद व उत्साह व्दिगुणित करण्यासाठी भाऊसाहेब भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली मोरया थिएटर्स या निर्मिती संस्थे अंतर्गत ‘गणराया’ ही भक्तीरसपूर्ण गणेश वंदना (गीत) उदयोन्मुख कलावंतांनी गायिले असून सदर गाणे ‘स्वरात्म’ या युटूब चॅनलवर उपलब्ध आहे.
या भक्ती गीतातील नवोदित कलाकार : गायक : तेजेश्री देशपांडे, आशुतोष सुरजुसे, निधी हेगडे, आदित्य वजलवार, अक्षय म्हाप्रळकर, संमिता धापटे, संगीतकार : तेजेश्री देशपांडे, आशुतोष सुरजुसे संजीत आयोजन : श्री तेजस चव्हाण (Rezongnce Studio), शब्द रचना: अरुण सांगोळे, ढोल पथक रोहित कांबळे, छाया संकलन : बी. महंतेश्वर, छाया चित्रण: सागर मुव्हीज, व्हिडीओ संपादक तेजस चव्हाण. शब्द, संगीत आणि ताल यांचा सुरेख मिलाप करून गायकांनी स्वरांना जो न्याय दिला आहे तो प्रशंसनीय आहे. एकंदरीत गणराया हे गणेशभक्तांसाठी भक्तिमय आहे.