पिंपरी चिंचवड बार असोसिएशनतर्फे नवीन न्यायमूर्तींचे स्वागत
पिंपरी (Pclive7.com):- मोरवाडी न्यायालयात न्यायमूर्ती एन टी भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवनियुक्त न्यायमूर्तींनी आज (सोमवारी) त्यांचा पदभार स्वीकारला. त्याबद्दल पिंपरी-चिंचवड बार असोसिएशनतर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले.
पिंपरी-चिंचवड बार असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष अॅड. सुनील कडुसकर यांनी नवीन न्यायमूर्तींचे स्वागत केले. यावेळी मुख्य न्यायमूर्ती के एम पिंगळे, न्यायमूर्ती ए यु सुपेकर, अॅड. सुनील कड, अॅड. किरण पवार, अॅड. सतीश गोरडे, अॅड. बी के कांबळे, अॅड. देवराम ढाळे, अॅड. दिनकर लाळगे, अॅड. जे के काळभोर, अॅड. मकरंद गोखले, अॅड. प्रशांत अहिरे, अॅड. हर्षद नढे, अॅड. सागर अडागळे, अॅड. निशांत यादव, अॅड.सुनील माने, सचिव अॅड. गोरख कुंभार, अॅड. शशिकांत गावडे, अॅड. पूनम राऊत, अॅड. सविता तोडकर, अॅड. सारिका परदेशी, अॅड. गजेंद्र तायडे आदी उपस्थित होते.
अॅड. सुनील होनराव, अॅड. अविनाश ववले, अॅड. नारायण थोरात यांचा वाढदिवस देखील साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. संतोष मोरे यांनी केले. तर आभार अंकुश गोयल यांनी मानले.