पिंपरी (Pclive7.com):- मावळ लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ चिंचवड विधानसभा मतदारसंघात आज ‘बाईक रॅली’चे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने युवावर्ग सहभागी झाला होता. वाकड पोलीस चौकी येथून सुरू झालेल्या रॅलीचे आयोजन नगरसेवक मयुर कलाटे यांनी केले होते.
पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ चिंचवड मतदारसंघात ‘बाईक रॅली’चे आयोजन करण्यात आले होते. वाकड पोलिस स्टेशन येथून आज दुपारी ५ वाजता या रॅलीची सुरुवात करण्यात आली. या रॅलीमध्ये नगरसेवक मयुर कलाटे, नाना काटे, राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांच्यासह मोठ्या संख्येने युवा कार्यकर्ते उपस्थित होते.
वाकड पोलिस स्टेशन येथून सुरू झालेली ही रॅली उत्कर्ष चौक, मानकर चौक, मेराझो हॉटेल, विशालनगर, पिंपळे निलख गावठाण, विशालनगर, मानकर चौक, काळेवाडी फाटा, सोनाई मंगल कार्यालय, अशोका सोसायटी, थेरगाव गावठाण, दगडू बारणे चौक, शरद बारणे ऑफिस, पोलीस लाईन अंडरपास, प्रेरणा पतसंस्था, मंगलनगर, वाकड फाटा, डांगे चौक, गणेश मंदिर, दुर्गा कॉलनी क्रमांक ३, चौधरी पार्क, काळाखडक, भुमकर चौक, मार्गे संत तुकाराम कार्यालय अशी काढण्यात आली. राष्ट्रवादीचा विजय असो, पार्थ पवार तुम आगे बढो, येऊन येऊन येणार कोण.. पार्थ पवार यांच्या शिवाय हायचं कोण.. अशा जोरदार घोषणांनी चिंचवड मतदारसंघ राष्ट्रवादीमय झाल्याचे चित्र पहायला मिळाले.