पिंपरी (Pclive7.com):- कासारवाडी येथे भींत कोसळून घडलेल्या दुर्दैवी घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या लोकेश ठाकूर या बालकाच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करण्यात आले. तसेच त्यांना पिंपरी विधानसभा युवासेने तर्फे आर्थिक मदत देण्यात आली.
याप्रसंगी पिंपरी विधानसभा युवती सेनाधिकारी प्रतिक्षा घुले, विभाग संघटक निलेश हाके, माहिती अधिकार कार्यकर्ते अजित बोराडे, उपविभाग संघटक सनी कड, ओंकार जगदाळे, रवि नगरकर, नंदकुमार देवकर उपस्थित होते.