पिंपरी (Pclive7.com):- लोकसभेत झालेल्या पराभवानंतर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने तयारी सुरू केलीयं. आज रविवार दि.२८ जुलै रोजी निसर्ग मंगल कार्यालय, गुलटेकडी, मार्केटयार्ड, पुणे सायंकाळी ५ वाजता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विद्या चव्हाण, पार्थ पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तिनही विधानसभा मतदार संघातील एकूण २० इच्छूक उमेदवारांची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, प्रवक्ते फजल शेख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
चिंचवड विधानसभेतून एकूण ८ इच्छुकांनी मुलाखत दिली. त्यात राजेंद्र गणपत जगताप, विशाल शंकर वाकडकर, भाऊसाहेब रामभाऊ भोईर, मोरेश्वर महादू भोंडवे, मयुर पांडुरंग कलाटे, विठ्ठल (नाना) कृष्णाजी काटे, प्रशांत कृष्णराव शितोळे, सतिश दगडू दरेकर यांचा समावेश आहे.
पिंपरी विधानसभेतूनही ८ जणांनी मुलाखत दिली. ॲड. गोरक्ष जाकाराम लोखंडे, सुलक्षणा शिलवंत-धर, राजू विश्वनाथ बनसोडे, संदीपान रामा झोंबाडे, शेखर अशोक ओव्हाळ, सुनंदा सतिश काटे, आण्णा दादू बनसोडे, काळूराम मारूती पवार यांनी मुलाखत दिली.
बहुचर्चित असलेल्या भोसरी विधानसभेतून केवळ चार इच्छुक आहेत. त्यात विलास विठोबा लांडे, शांताराम दगडू भालेकर, दत्तात्रय कोंडिबा जगताप, पंडीत रामभाऊ गवळी यांचा समावेश आहे. तर भोसरीतून तीव्र इच्छुक असलेले माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी मुलाखतीकडे पाठ फिरवली. त्यामुळे साने आता नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.