पिंपरी (Pclive7.com):- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त चिंचवड विधानसभा मतदारसंघात युवासेनेच्यावतीने आयोजित मोफत आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पिंपरी चिंचवड महापालिकेतील शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांच्या हस्ते या शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. या शिबीराचा सुमारे शंभरहून अधिक नागरिकांनी लाभ घेतला.
यावेळी छावा मराठा युवा महासंघाचे अध्यक्ष धनाजी येळकर पाटील, अर्जुन मामा शिरसाठ, साळवे साहेब, बाळासाहेब गोडसे, बाबासाहेब जगताप, भंडारी साहेब, गणेश खाणेकर, संतोष लिमकर, विलास भिसे, बाळासाहेब दरेकर, सखाराम जाधव, अतुल बलकवडे, सचिन सोनाटे, महेंद्र सकपाळ, दादासाहेब सुंभ, आप्पा खोडदे, गणेश सर्वगोड, धीरज कुलकर्णी, आकाश आचारी, हेमंत राजस्थ,आशिष पवार, मानस जाधव, अक्षय माने, आदित्य गवळी, अभय शेळके आदी उपस्थित होते.
या शिबीरात संपूर्ण शरिराची तपासणी करण्यात आली होती. यावेळी जेष्ठ नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. या शिबीरात सुमारे शंभर जणांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. जिजाऊ महिला बचत गट, राजमाता महिला बचत गट, साईराज प्रतिष्ठान, जय अंबे ग्रुपच्या वतीने या शिबीराचे संयोजन करण्यात आले होते. तर चिंचवड विधानसभा युवासेनेचे राकेश वाकुर्डे, हनुमंत पिसाळ यांनी शिबीराचे आयोजन केले होते.