पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी विधानसभेचे सभेचे विद्यमान आमदार गौतम चाबुकस्वार यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे. यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एबी फॉर्म देत उमेदवारी जाहीर केल्याची स्वतः गौतम चाबुकस्वार यांनी पीसी लाईव्ह न्युजशी बोलताना सांगितले. दरम्यान याबाबत पक्षाकडून याबाबत अधिकृत घोषणा लवकरच होईल असेही त्यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. येत्या २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र अद्याप शिवसेना-भाजपची युती जागावाटपाच्या तिढ्यामुळे झालेली नाही. तरी देखील शिवसेनेने आज ६३ विद्यमान आमदारांची तातडीची बैठक बोलवत उमेदवारी जाहीर करत कामाला लागण्याच्या सूचना दिल्यात. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गौतम चाबुकस्वार यांना एबी फॉर्म देत पुन्हा उमेदवारी देत असल्याचे सांगितले. तसेच कामाला लागण्याच्या सूचना देत, विजय होण्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या असल्याचे गौतम चाबुकस्वार यांनी सांगितले.