मुंबई (Pclive7.com):- काँग्रेसने अखेर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. काँग्रेसच्या पहिल्या उमेदवार यादीत प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह ५१ नावांचा समावेश आहे.
काँग्रेस आपली पहिली यादी २० सप्टेंबरला जाहीर करणार असल्याचं आधी म्हटलं जात होतं. त्यानंतर २१ तारखेला विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या. त्यामुळे २३ सप्टेंबरला पहिली यादी जाहीर करण्याचा मुहूर्त ठरला, मात्र तोही अखेर लांबला. आता पितृपक्ष संपल्यानंतर काँग्रेसने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.
काँग्रेसची विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी