पिंपरी (Pclive7.com):- विश्व हिंदू परिषदेच्या बजरंग दल विभागाची अखिल भारतीय बैठक चिखली येथील गणेश इंटरनॅशनल स्कूलमध्ये सुरू झाली आहे. या कार्यक्रमाच्या प्रारंभी दीप प्रज्वलन करून श्रीराम प्रभूंच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आले. बैठकीमध्ये बजरंग दलाचे देशातील सर्व ४४ प्रांतातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित आहेत, या बैठकीतील पदाधिकाऱ्यांना संबोधित करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री मिलिंदजी परांडे, केंद्रीय संघटन महामंत्री विनायकराव देशपांडे, इस्कॉन या संस्थेचे प्रभुजी वैष्णव दास, पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री विजयराव देशपांडे व्यासपीठावर उपस्थित होते.
केंद्रीय संयोजक सोहनजी सोळंकी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तसेच मिलिंदजी परांडे यांनी CAA संबंधित समाजात जागृती आणि संबंधिताकडून फॉर्म भरण्याची प्रक्रिया योजना पूर्वक पूर्ण घेतली पाहिजे असे प्रतिपादन केले. तसेच श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माणासाठी विश्व हिंदू परिषदेने संपूर्ण देशभर २५ मार्च वर्षप्रतिपदा ते ८ एप्रिल २०२० हनुमान जयंतीपर्यंत भव्य रथयात्रांचे आयोजन करून देशभरात दोन लाख स्थानापर्यंत रामोत्सव करण्याचा निश्चय केला आहे. ५०० वर्षांचा कलंक धुवून हिंदू समाजाने जे ठरविले तेच केले याचा हा विजयोत्सव आहे. ही बैठक दोन दिवसीय असून दि. २३ फेब्रुवारी संध्याकाळी पाच वाजता सांगता होईल, या बैठकीसाठी उद्घाटन सत्रामध्ये आमदार महेश लांडगे, गणेश इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक एस. बी. पाटील, मुंबई क्षेत्र गोरक्षा प्रमुख भाऊरावजी कुदळे, प्रांत कोषाध्यक्ष CA महेंद्रजी देवी, प्रांत सहमंत्री विवेकराव कुलकर्णी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पिंपरी-चिंचवड जिल्हा कार्यवाह विलासराव लांडगे, विहिंप, पिंपरी चिंचवड जिल्हा अध्यक्ष शरदराव इनामदार, जिल्हा कार्याध्यक्ष धनाजीराव शिंदे, आणि विश्व हिंदू परिषद, पिंपरी चिंचवड जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. अशी अधिकृत माहिती पश्चिम महाराष्ट्र प्रांत सह प्रचार प्रसार प्रमुख यांनी दिली.