पिंपरी (Pclive7.com):- कासारवाडी मधील सूर्य महादेव मंदिरात महाशिवरात्र निमित्त आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. विशेष म्हणजे ओम शांती संस्थेतर्फे बारा ज्योतिर्लिंग दर्शन असा देखावा भाविकांसाठी ठेवण्यात आला होता.

शुक्रवारी पहाटे ५ वाजता महाभिषेक करण्यात आला. सकाळी ९ ते रात्री १० पर्यंत भाविकांना खिचडी वाटण्यात आली. दुपारी ३ वाजता मुक्ताई भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला. मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. संध्याकाळी ७ वाजता प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थित महाआरती करण्यात आली. यावेळी उपस्थित भोसरी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री.अवताडे साहेब, नगरसेवक शाम लांडे, नगरसेवक माऊली थोरात, नगरसेविका आशा शेंडगे, नगरसेवक राजू बनसोडे, नगरसेविका माई काटे, नगरसेवक सागर आंघोळकर, नगरसेवक अनिकेत काटे, माजी नगरसेवक दत्तोबा लांडगे, रामभाऊ पिंपळे, प्रकाश जवळकर, काळूराम लांडगे, छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल वीर, अशा अनेक मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली. मान्यवरांचा सत्कार आयोजक संदीप लांडगे यांच्या हस्ते करण्यात आला.
























Join Our Whatsapp Group