पिंपरी (Pclive7.com):- भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आज (दि.२६) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मध्यवर्ती कार्यालय, खराळवाडी, पिंपरी येथे सकाळी ०८.३० वाजता शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी योगेश बहल म्हणाले की, आज आपला भारत देश जागतिक स्तरावर एक महासत्ता म्हणून उदयाला येत आहे. तंत्रज्ञान असो, अंतराळ संशोधन असो किंवा आर्थिक क्षेत्र, भारताने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण हे वैभव टिकवून ठेवण्याची जबाबदारी आपल्या तरुणांच्या खांद्यावर आहे. भ्रष्टाचारमुक्त भारत, प्रदूषणमुक्त पर्यावरण आणि सर्वांना समान संधी मिळणारा समाज घडवणे, हेच आपले आजचे खरे कर्तव्य आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच यावेळी भारताचे संविधान वाचन करण्यात आले,

यावेळी शहराध्यक्ष योगेश बहल, युवक अध्यक्ष शेखर काटे, शहर कार्याध्यक्ष विजय लोखंडे, नगरसेविका वर्षा जगताप, सविता आसवानी, जितेंद्र ननावरे, विद्यार्थी अध्यक्ष अथर्व कोकणे, ॲड. सचिन औटे, माजी नगरसेवक सतीश दरेकर, धनराज आसवानी, ज्ञानेश्वर कांबळे, मायला खत्री, विनायक रणसुभे, खजिनदार दीपक साकोरे, सेवादल अध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ माऊली मोरे, सामाजिक न्याय अध्यक्ष संजय औसरमल, चिंचवड विधानसभा महिला अध्यक्षा संगीता कोकणे, राजेंद्रसिंग वालिया, अकबर मुल्ला, अल्पसंख्याक अध्यक्ष युसूफ कुरेशी, संग्राम चव्हाण, शक्रुल्ला पठाण, पदवीधर सेल अध्यक्ष प्रदीप औटे, बाळासाहेब पिल्लेवार. महेश माने, चंद्रमा हलगी, भाग्यश्री मस्के, रूपाली गायकवाड, संपत पाचुंदकर, कुमार कांबळे, प्रवीण गव्हाणे, दत्तात्रय जगताप, श्रीकांत कदम, राजू चांदणे, महेश झपके, अविनाश सोनवणे, ॲड.निशा कांबळे, कविता खराडे, नीलिमा पवार, पुनम तापकीर, सतीश क्षीरसागर, देवी थोरात, अमित तापकीर, तुकाराम बजबळकर, प्रदीप गायकवाड, श्रीमंत जगताप, झहीर उर्फ छोटू खान, रमजान सय्यद, बबन कांबळे, उमेश गायकवाड, अण्णा पारवटे, विक्रम पवार, हनुमंत वाबळे, ॲड.वसंत कांबळे, समाधान गायकवाड, इम्रान शेख, युवराज पवार, पूजा वायचळ, बाळासाहेब जगताप, सदर कार्यक्रमासाठी धनाजी तांबे, सुनिल अडागळे इत्यादीसह पदाधिकारींसह अनेक कार्यकर्ते उपस्थिती होते.






















Join Our Whatsapp Group