पिंपरी (Pclive7.com):- देशाचा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना पिंपरी चिंचवड महानगरपालिका मुख्य प्रशासकीय इमारत २६ जानेवारीच्या पूर्वसंध्येला आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाली. तिरंगा रंगसंगतीतील दिव्यांच्या सजावटीमुळे संपूर्ण इमारत लक्षवेधी आणि राष्ट्रभक्तीचा संदेश देणारी दिसून येत आहे.

इमारतीच्या दर्शनी भागावर तसेच सभोवतालच्या परिसरात हिरवा, पांढरा आणि केशरी रंगातील एलईडी दिव्यांची भव्य मांडणी करण्यात आली आहे, ज्यामुळे परिसर अधिकच तेजस्वी व प्रेरणादायी झाला आहे. या रोषणाईमुळे नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून अनेक नागरिक इमारतीसमोर थांबून छायाचित्रे काढत आहेत. महानगरपालिकेच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शहरात विविध ठिकाणी देशभक्तीपर कार्यक्रम, ध्वजारोहण आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
महानगरपालिकेच्या या रोषणाईमुळे पिंपरी-चिंचवड शहरात प्रजासत्ताक दिनाचा उत्सव अधिकच दिमाखात साजरा होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.






















Join Our Whatsapp Group