पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील रावेत परिसरात मुख्य अशुद्ध पाण्याच्या (रॉ वॉटर) जलवाहिनीला गळती आढळून आली आहे. या गळतीमुळे शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेवर परिणाम झाला असून पाणीपुरवठा विभागाकडून तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.

सदर गळती दुरुस्तीचे काम आज (दि.२५) सायंकाळपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे. मात्र, या कामामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक भागांमध्ये आज संध्याकाळचा पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित राहणार असून काही भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

तसेच, उद्या देखील काही परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा योग्य आणि काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता अजय सूर्यवंशी यांनी केले आहे.






















Join Our Whatsapp Group