चिखली (Pclive7.com):- चिखली परिसरात पतीने आपल्या पत्नीवर भाजी कापण्याच्या सुरीने वार करून तिला जखमी केले. ही घटना गुरुवारी (२२ जानेवारी) रोजी रात्री नेवाळे वस्ती, चिखली येथे घडली.

या प्रकरणात पीडित महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी सुनील बालाजी गोरे (३८, नेवाळे वस्ती, चिखली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे पती-पत्नी आहेत. आरोपी फिर्यादीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असताना फिर्यादीने त्यांना बाजूला केले. याचा राग आल्याने आरोपीने पत्नीला शिवीगाळ करत मारहाण केली आणि घरातील भाजी कापण्याच्या सुरीने त्यांच्या हाताच्या बोटावर वार करून जखमी केले. चिखली पोलीस तपास करत आहेत.






















Join Our Whatsapp Group