पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापौरपदाची निवडणूक ६ फेब्रुवारी रोजी होणार असल्याचे स्पष्ट झाले असून, आता या निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम नगरसचिव मुकेश कोळप यांनी जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार महापौर व उपमहापौर पदासाठी इच्छुक उमेदवारांना २ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज दाखल करावे लागणार आहेत.

यानंतर ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात येणार आहे. या सभेत महापौर व उपमहापौर पदासाठी निवड प्रक्रियेला अंतिम स्वरूप देण्यात येईल. निवड झाल्यानंतर नवे महापौर अधिकृतपणे पदभार स्वीकारतील.

महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, अनेक नावांवर चर्चा सुरू झाली आहे. आगामी काही दिवसांत महापौरपदाच्या शर्यतीतील चित्र अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.























Join Our Whatsapp Group