
अभय छाजेड यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून होणार उद्घाटन
पिंपरी (Pclive7.com):- ८ व्या राष्ट्रीय मास्टर्स गेम्सचे मंगळवारी २७ जानेवारी दुपारी ४ वाजता, हेडगेवार क्रीडा संकुल, मासुळकर कॉलनी, पिंपरी, पुणे १८ येथे पुणे जिल्हा हौशी ॲथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष अभय छाजेड आणि या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वात ज्येष्ठ व्यक्तीच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून होणार आहे अशी माहिती सुपर मास्टर्स गेम्स ॲन्ड स्पोर्ट्स फेडरेशन मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद कुमार यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

या स्पर्धेचे बोधचिन्ह “शुभंकर – शेकरू” आहे. https://www.mastersgames. in या वेबसाईटवर आणि अधिक माहितीसाठी https:// clouckofficial.github.io/ mastersgames/ येथे संपर्क साधावा असे आवाहन सुपर मास्टर्स गेम्स ॲन्ड स्पोर्ट्स फेडरेशन महाराष्ट्र अध्यक्ष रामसिंग संघा आणि महाराष्ट्र सरचिटणीस शैलेश फुलसुंगे यांनी दिली आहे.

सुपर मास्टर्स गेम्स ॲन्ड स्पोर्ट्स फेडरेशनच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात प्रथमच स्पर्धांचे आयोजन केले आहे. दि. २८ ते ३१ जानेवारी दरम्यान या सर्व स्पर्धा संपन्न होणार आहेत. त्यापैकी हेडगेवार क्रीडा संकुल येथे फुटबॉल, कबड्डी, वेटलिफ्टिंग पावर लिफ्टिंग, आर्म रेसलिंग, बुद्धिबळ, डार्ट गेम, ज्युडो आणि कराटे या स्पर्धा होतील. संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल, इंद्रायणी नगर भोसरी येथे व्हॉलीबॉल, ऍथलेटिक्स, टेनिस, योगा या स्पर्धा होतील. वेदांत स्पोर्ट्स अकॅडमी, ताथवडे येथे बॅडमिंटन आणि टेबल टेनिस या स्पर्धा होतील. बास्केटबॉल स्टेडियम स्पाइन रोड, सेक्टर ९, प्राधिकरण मोशी येथे बास्केटबॉल च्या स्पर्धा होतील. तानाजी लांडगे क्रीडा संकुल कासारवाडी येथे हँडबॉल, नेहरूनगर पिंपरी येथील मेजर ध्यानचंद पॉलीग्रास हॉकी मैदान येथे हॉकीच्या स्पर्धा, मदनलाल धिंग्रा क्रिकेट स्टेडियम निगडी प्राधिकरण येथे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा, चिंचवड येथील पीसीएमसी आर्चरी अकॅडमी येथे धनुर्विद्या (तिरंदाजी) स्पर्धा, चिखली येथील रायफल शूटिंग सेंटर येथे शूटिंगच्या स्पर्धा आणि नेहरूनगर, पिंपरी येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम मधील जलतरण तलाव येथे पोहोण्याच्या स्पर्धा होणार आहेत. या सर्व स्पर्धेमध्ये तीस वर्षांपुढील स्त्री, पुरुष सहभाग घेता येईल. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन माहिती घेण्यासाठी शैलेश फुलसुंगे (९७६४९२९१७१) यांच्याशी संपर्क साधावा. या स्पर्धेमध्ये देशभरातून पाच हजार पेक्षा जास्त नामांकित खेळाडू सहभाग घेतील.

सुपर मास्टर्स गेम्स ॲन्ड स्पोर्ट्स फेडरेशन या राष्ट्रीय संस्थेची स्थापना २०१७ मध्ये संस्थापक अध्यक्ष डॉ. अनमोल रतन सिद्धू व संस्थापक सरचिटणीस विनोद कुमार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. २०१७ मध्ये पहिल्या मास्टर गेम्स स्पर्धा चंदिगड मध्ये घेण्यात आल्या. डेहराडून, बडोदा, त्रिवेंद्रम, वाराणसी, गोवा आणि धर्मशाळा अशा विविध राज्यात यापूर्वीच्या स्पर्धा घेण्यात आल्या आहेत. एप्रिल २०२५ मध्ये धर्मशाळा, हिमाचल प्रदेश येथे झालेल्या स्पर्धेत पंजाब येथील १०२ वर्षाचे जेष्ठ नागरिक जगीर सिंह यांनी १०० आणि २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला होता. त्यावेळी त्यांचा मुलगा आणि नातू यांनी देखील स्पर्धेत सहभाग घेतला होता. नागरिकांमध्ये खेळाविषयी आवड निर्माण करणे हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे.























Join Our Whatsapp Group