पिंपरी (Pclive7.com):- कोल्हापूर, सोलापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही. मात्र, पुण्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढतोय. आतापर्यंत १६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्यात आज, आणखी एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला असून, जिल्ह्यातील रुग्णांची संख्या १६ वर पोहोचली आहे. तर राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा ३३ वर पोहोचला आहे. ही व्यक्ती पिंपरी चिंचवड मधील असून येथील रूग्णांची संख्या आता ९ झाली आहे.
पिंपरी चिंचवडमधील एका व्यक्तीचा आज चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात कोरोनाचे एकूण १६ रुग्ण झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असून या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. पिंपरी चिंचवड भागातील ही व्यक्ती जपानला जाऊन आली होती. त्या व्यक्तीची १४ मार्चला चाचणी करण्यात आली, तिचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला. सुरूवाताला ३, त्यानंतर ५ आणि आज १ रूग्ण पॉझिटिव्ह आल्याने पिंपरी चिंचवडमधील रूग्णांची सर्वांधिक संख्या म्हणजे ९ झाली आहे.