आज शुक्रवार दि.१८ डिसेंबर रोजी श्रवण नक्षत्र असल्यामुळे व्याघात नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावामुळे १२ पैकी ६ राशीच्या लोकांनी सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे. या ६ राशीच्या लोकांना दिवस धावपळीचा आणि धनहानीचा राहू शकतो. या व्यतिरिक्त इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.
जाणून घ्या कसा राहील शुक्रवार..
मेष : शुभ रंग : डाळिंबी : अंक : ७
नोकरीच्या ठिकाणी बिनचूक काम करण्यास प्राधान्य द्या. नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी.
वृषभ : शुभ रंग : डाळिंबी : अंक : ९
नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांना काही सुचवण्यासाठी आजचा दिवस योग्य नाही. आज फक्त कष्ट करीत राहा, फळाची अपेक्षा मात्र उद्याच करा.
मिथुन : शुभ रंग : मरून : अंक : ८
नवीनच झालेल्या ओळखीत लगेच विश्वास ठेवू नका. काही गोडबोली माणसे भेटतील. झटपट लाभाचा मोह टाळणेच हिताचे. कामापुरतेच बोला.
कर्क : शुभ रंग : हिरवा : अंक : ६
आज सभा-संमेलनात तुमच्या वक्तृत्वाचा प्रभाव पडेल. जोडीदाराचे मन जपण्याचा प्रयत्न कराल. आनंदी दिवस.
सिंह : शुभ रंग : पांढरा : अंक : ४
नोकरीत कंटाळवाणी कामे करावी लागतील. साहेबांचे समाधान केवळ अशक्य. शारीरिक थकवा जाणवेल.
कन्या : शुभ रंग : पिस्ता : अंक : ५
कर्तव्यापेक्षा मौजमजेस प्राधान्य द्याल. चंगळवादी वृत्ती राहील. जुन्या मित्रांच्या सहवासात रमाल.
तूळ : शुभ रंग : भगवा : अंक : ३
प्राॅपर्टीसंबंधी अपुरे व्यवहार मार्गी लागतील. आज विद्यार्थ्यांकडून काहीतरी कौतुकास्पद कामगिरी होईल.
वृश्चिक : शुभ रंग : मोतिया : अंक : १
व्यवसायात जाहिरातबाजी वाढवावी लागेल. जुनी तत्त्वे गुंडाळून ठेवावी लागतील. कामाचे तासही वाढवावेत.
धनू : शुभ रंग : स्ट्रॉबेरी : अंक : ९
अति धावपळ टाळा. हार्ड वर्क पेक्षा स्मार्ट वर्क करण्यास प्राधान्य द्या. व्यवसायात काही उत्तम संधी चालून येतील.
मकर : शुभ रंग : राखाडी : अंक : २
प्रकृती ठणठणीत असल्याने तुम्हाला कामात चांगला उत्साह राहील. वेेळेवर पुरेसा पैसाही उपलब्ध होईल.
कुंभ : शुभ रंग : आकाशी : अंक : ४
आज काही पूर्वीच्या चुका निस्तराव्या लागणार आहेत. अनावश्यक खर्चास तत्काळ ब्रेक गरजेचा आहे.
मीन : शुभ रंग : निळा : अंक : ७
आज तुमचे मनोबल उत्तम राहील. काही अनपेक्षित लाभ होण्याची शक्यता आहे. आप्तस्वकीयात मान मिळेल.