पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या कमी होण्याऐवजी वाढताना दिसत आहे. आज (दि.२४) शहरात दिवसभरात ४२५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. दरम्यान एका कोरोना रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे .
आज ४४० जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देत घरी सोडण्यात आले आहे. काल मंगळवारी (दि.२३) दिवसभरात २०४ नवे कोरोनाबाधित आढळले होते, तर एका रुग्णांचा मृत्यू झाला होता.
कोरोनामुळे पिंपरी चिंचवडमध्ये आतापर्यंत १ लाख ४ हजार ५० कोरोना बाधित रूग्ण आढळले आहेत. तर २ हजार ६०५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ९९ हजार ५३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान आज शहरातील रूग्णालयात ३ हजार १६४ कोरोना बाधित रूग्ण आहेत. त्यातील ७३७ जणांवर रूग्णालयात उपचार सुरू असून उर्ववित २४२७ रूग्ण होम क्वारंटाईन आहेत.