हिंजवडी (Pclive7.com):- शेअर्समध्ये पैसे गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून एकाची २४ लाख ४३ हजार ७३३ रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना मुळशी येथील माणमधील रहिवाशासोबत घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४५ वर्षीय फिर्यादी यांना अनोळखी क्रमांकावरून रविसिंग नावाच्या व्यक्तीने संपर्क साधला. शेअर्समध्ये पैसे गुंतवल्यास तुम्हाला चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले. याद्वारे आरोपीने फिर्यादीकडून वेगवेगळ्या खात्यांमधून एकूण २४ लाख ४३ हजार ७३३ रुपये घेऊन, परतावा न देता फसवणूक केली. याविरोधात फिर्यादीने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीने त्यांच्या ८० वर्षे वयाच्या वडिलांच्या खात्यामधील पैसेही गुंतविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.