मेष : शुभ रंग : निळा : अंक : ५
नोकरीच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढल्या तरी बढतीच्या मार्गातील अडथळेही दूर होतील. येणी वसूल होतील.
वृषभ : शुभ रंग : जांभळा : अंक : ६
महत्त्वाची कामे दुपारपूर्वीच करून मोकळे व्हा. आज स्वावलंबन महत्त्वाचे राहील. कामातील निष्ठा व समर्पण वरिष्ठांना प्रभावित करेल.
मिथुन : शुभ रंग : राखाडी : अंक : ४
आज स्वत:चे लाड पुरवण्यासाठी खर्च कराल. अाधुनिक राहणीमानाकडे कल राहील. चर्चा आज फक्त वादास निमंत्रण देईल. संयम ठेवा.
कर्क : शुभ रंग : मोतिया : अंक : ३
विविध मार्गाने आर्थिक लाभ होणार आहेत. भावनेच्या भरात दिलेले शब्द पाळावे लागणार.
सिंह : शुभ रंग : क्रीम : अंक : १
चढउतारांचा सामना करावाच लागणार आहे. मनाविरुद्ध काही घटना मनास बेचैन करतील.
कन्या : शुभ रंग : पिस्ता : अंक : २
सदस्यांमध्ये सामंजस्य राहील. विवाहाविषयी बोलणी करायची असतील दिवस योग्य.
तूळ : शुभ रंग : गुलाबी : अंक : ८
तुमचा जास्त वेळ घराबाहेरच जाईल. बेरोजगारांच्या भटकंतीस यश येईल. दुपारनंतर हरवलेले गवसेल.
वृश्चिक : शुभ रंग : चंदेरी : अंक : ७
उत्साही व आनंदी असा आजचा दिवस आहे. काही दुरावलेल्या हितसंबंधांत सुधारणा होईल.
धनू : शुभ रंग : पांढरा : अंक : ९
आज नोकरीत वाढीव जबाबदाऱ्या आनंदाने स्वीकारून स्वत:चे वर्चस्व सिद्ध कराल.
मकर : शुभ रंग : सोनेरी : अंक : ४
संध्याकाळी क्षुल्लक मतभेद होतील. आज नास्तिक मंडळीही गरजेपुरती अध्यात्मिक होतील.
कुंभ : शुभ रंग : लाल : अंक : ३
व्यापाऱ्यांसाठी उत्तम दिवस. दुकानदारांच्या गल्ल्यात लक्षणीय वाढ होईल. गाडी जपून चालवा.
मीन : शुभ रंग : स्ट्रॉबेरी : अंक : ८
कौटुंबिक जीवन समाधानी असेल. आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवू शकाल. जोडीदारास सरप्राइज गिफ्ट द्याल.