पिंपरी (Pclive7.com):- कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे विनामास्क फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. सोमवारी (दि.१५) पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ३५३ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झाला आहे. गेल्या तीन दिवसांपासून शहरात दोन हजाराहू अधिक रुग्ण सापडले आहेत. काल (दि.१५) दिवसभरात ७२८ त्यामुळे पोलिसांनी विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
सोमवारी पोलिसांनी ५३४ जणांवर केलेली कारवाई पुढीलप्रमाणे –
एमआयडीसी भोसरी (५४), भोसरी (२९), पिंपरी (२१), चिंचवड (३९), निगडी (३१), आळंदी (४०), चाकण (०४), दिघी (३३), म्हाळुंगे चौकी (१९), सांगवी (१४), वाकड (२८), हिंजवडी (२२), देहूरोड (०३), तळेगाव दाभाडे (०३), तळेगाव एमआयडीसी (०५), चिखली (०८), रावेत चौकी (००), शिरगाव चौकी (००)