पिंपरी (Pclive7.com):- प्रभाग क्र.०२ जाधववाडी, परिसरातील नव्यानेच तयार झालेल्या गृहप्रकल्पातील नागरिकांसाठी प्रभागाचे नगरसेवक तथा माजी महापौर राहुल जाधव आणि दत्त दिगंबर महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन सौ. मंगलताई राहुल जाधव यांच्या संकल्पनेतून मोफत रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्या शुभहस्ते पार पडला.
यावेळी प्रास्ताविक करताना राहुल जाधव म्हणाले की, आमदार महेेश लांडगे यांच्या नेतृत्वात या भागाचा विकास होत असताना नागरिकीकरण झपाट्याने वाढले आहे. तरी या भागातील गृहप्रकल्पातील रहिवास्यांना अनेक मुलभूत सुविधासाठी संघर्ष करावा लागत आहे. तसेच अनेक बांधकाम व्यावसायिकांनी रहिवाश्यांना कराराप्रमाणे मुलभूत सुविधा देणे अपेक्षित होते. परंतु संबंधित बांधकाम व्यावसायिकांनी या रहिवाश्यांना कराराप्रमाणे मुुलभूत सुविधा दिलेल्या नाही. रहिवाश्यांच्या प्रश्नासाठी संंबधित बांधकाम व्यावसायिकांशी बोलून प्रसंगी संघर्ष करून नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील. तसेच या भागातील नागरिकांचे रस्त्याचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील, ते सर्व प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जातील. तसेच या कोरोना काळामध्ये या भागातील लोकांसाठी रुग्णवाहिकेची गरज ओळखून मोफत रुग्णवाहिका सेवा पुरविण्यासाठी रुग्णवाहिकेचे लोकार्पण करत आहोत.
यावेळी बोलताना आमदार महेश लांडगे यांनी सांगितले की, पिंपरी चिंचवड शहरातील वाढते नागरिकीकरण लक्षात घेता अनेक मुलभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. पाण्याची समस्या खूप मोठी आहे. पुढील काही काळामध्ये भामा-आसखेडचे पाणी या भागातील नागरिकांना भेटेल. तसेच वाघोली पाणी पुरवठा योजना ताब्यात घेऊन परीसातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील.
या कोरोनाकाळामध्ये राहुलदादा आणि मंगलताई जाधव यांनी सुरु केलेल्या या उपक्रमाचे आमदार महेश लांडगे यांनी कौतुक केले. तसेच यापुढील काळामध्ये सर्वांनी आपापली काळजी घेण्याचे तसेच मास्कचा वापर करण्याचे आव्हान महेश लांडगे यांनी केले.
यावेळी ऐश्वर्यंम हमारा, रिवर रेसीडेन्सी, वास्तू ड्रिम, मिलिनियम पँरामाउट, ऐश्वर्यंम हमारा, म्हाडा क्रिस्टल सीटी, रामकृष्ण हरी, स्वस्तिक स्पिरा, कोलुसुस ग्रीन सीटी, अक्षा वृंदावन, अक्षा अँम्पयर, भूमी सिलिरिओ वैष्णवी, गायत्री लेन्स, जी.के. कनवर, आकाश वेद, अध्याराध, विष्णू विहार, विष्णू ग्रीन, एवरेस्ट प्लाझा, लवनेस्ट इ. सोसायटीतील प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी सर्वांनी मास्क परिधान करून सामाजिक अंतर पाळुन या कार्यक्रमामध्ये भाग घेतला.