आज सोमवार दि.०५ एप्रिल रोजी उत्तराषाढा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. यासोबतच आजची ग्रहस्थिती शिवा नावाचा शुभ योग तयार करत आहे. या शुभ योगाचा फायदा १२ पैकी ७ राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. शुभ योगाच्या प्रभावाने करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. नशिबाची साथ मिळू शकते. पैशाशी संबंधित अडचणी नष्ट होऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.
मेष : शुभ रंग : राखाडी : अंक : १
व्यवसायात भिडस्तपणास लगाम घालणे गरजेचे. काही निर्णय झटपट घ्यावे लागतील. संधी सोडू नका.
वृषभ : शुभ रंग : सोनेरी : अंक : २
वडिलधाऱ्यांशी मतभेद होतील पण तुम्ही त्यांच्या वयाचा मान राखाल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांशीही नमतेच घ्यावे लागेल. आज अहंकारास सटीच देणे हिताचे.
मिथुन : शुभ रंग : चंदेरी : अंक : ९
उताविळपणे कोणतेही निर्णय घेणे योग्य ठरणार नाही.आज तब्येतीच्या किरकोळ तक्रारीही दुर्लक्षित करू नका. महत्त्वाच्या चर्चा, वाटाघाटी उद्यावरच ढकलाव्यात.
कर्क : शुभ रंग : गुलाबी : अंक : ८
बऱ्याच दिवसांनी तुम्हाला अपेक्षित असलेल्या प्रिय व्यक्तीचा अचानक फोन येईल. कवींना प्रेमगीते सुचतील.
सिंह : शुभ रंग : स्ट्रॉबेरी : अंक : ९
आज तुम्ही फक्त स्वत:चा विचार करा. केवळ मोठेपणासाठी न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारू नका.
कन्या : शुभ रंग : पिस्ता : अंक : ६
आज एखादा नवीन विषय शिकण्याची संधी मिळेल. मुलांच्या शिस्तीकडे लक्ष पुरवावे लागणार आहे.
तूळ : शुभ रंग : पांढरा : अंक : ७
आज फक्त कर्तव्यास प्राधान्य द्याल. कौटुंबिक वाढत्या जबाबदाऱ्या पूर्ण करताना गृहिणींना थकवा जावेल.
वृश्चिक : शुभ रंग : जांभळा : अंक : ४
आज वेळेअभावी कौटुंबिक गरजांकडे तुमचे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. मातोश्रींशी मतभेद संभवतात.
धनू : शुभ रंग : मोरपिशी : अंक : ५
योग्य माणसे आज संपर्कात येतील. ठामपणे घेतलेले महत्त्वाचे फायदेशीर ठरतील. पैसा खेळता राहील.
मकर : शुभ रंग : मरून : अंक : १
आज हाती पैसा राहील. आवडत्या क्षेत्रात नेतृत्व करण्याची संधी मिळेल. आज स्वत:चे लाड पुरवाल.
कुंभ : शुभ रंग : नारिंगी : अंक : ३
आपले काम सोडून इतरांच्या भानगडीत डोकवाल. रिकामटेकड्या चर्चेतून वाद होण्याची शक्यता आहे.
मीन : शुभ रंग : डाळिंबी : अंक : २
हौशी मंडळींना आज जिवाची मुंबई करण्यास पुरेसा पैसा उपलब्ध होईल. तुमच्या कामातील उत्साह इतरांना प्रेरणा देईल.